Join us

​सलमान खानपाठोपाठ शाहरूख खानला सुद्धा बनायचेयं ‘आमिर खान’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 15:14 IST

होय, सलमान खाननंतर आता शाहरूख खानला सुद्धा आमिर खान बनायचे आहे. वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. ...

होय, सलमान खाननंतर आता शाहरूख खानला सुद्धा आमिर खान बनायचे आहे. वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. खरे तर सध्या बॉलिवूडमध्ये ‘आमिर’ बनण्याचे जणू फॅड आले आहे. सलमान खानचं नाही तर सैफ अली खान यानेही मध्यंतरी ‘आमिर’ बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अलीकडे अजय देवगण यानेही तशी हिंट दिली होती आणि आता शाहरूख खान या तयारीला लागला आहे. आता ‘आमिर’ बनण्याचे फॅड हा काय नवा लोचा आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढची बातमी तुम्ही वाचायलाच हवी.आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो आणि त्याचे हेच परफेक्शन त्याच्या प्रत्येक सिनेमातही दिसते. आमिरचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतो. यामागे एक कारण आहे. हे कारण म्हणजे, रिलीजच्या दोन महिन्यांआधी आमिर आपला प्रत्येक चित्रपट काही लोकांना दाखवतो आणि मग त्यांनी दिलेल्या बºया-वाईट प्रतिक्रियेनुसार त्यात आवश्यक ते बदल करतो. चित्रपट दाखवण्यासोबतच आमिरच्या चित्रपटाचे प्रमोशनही होते. आमिरचा हाच फंडा आता शाहरूख खानसह अनेक स्टार्स अमलात आणण्यासाठी आतूर आहेत. आपल्या आगामी चित्रपटासाठी शाहरूख खानही आमिरचा हाच फंडा वापरणार आहे.  म्हणजेच आपला आगामी चित्रपट काही लोकांना दाखवून  शाहरूख  त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे.ALSO READ: ​‘ही’ चर्चा खरी असेल तर शाहरूख खान देणार आणखी एक फ्लॉप!!शाहरूख लवकरच आनंद एल रायच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान डबल रोलमध्ये आहे. यात तो  बुटक्या व्यक्तीच्या रूपात दिसणार असल्याचे मानले जात आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जातेयं. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुसºया लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरणार आहे.  या चित्रपटात कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. यात ती ‘मेरी जान’ नामक पात्र साकारणार आहे. आधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. त्याला ही कथा प्रचंड आवडली होती. पण अचानक सलमानने या चित्रपटाला नकार कळवला आणि हा चित्रपट शाहरूखकडे आला. आता शाहरूखसाठी ‘आमिर’ फंडा यशाचा ठरो अन् त्याला  एक तरी हिट मिळो, हीच शुभेच्छा देऊ यात!