Join us

​शाहरुखने मुलींवर लिहिली कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 20:58 IST

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान केवळ अभिनेता नसून, तो उत्तम  कवी सुद्धा आहे. कारण की, त्याने मुलींवर लिहीलेली एक कविता ...

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान केवळ अभिनेता नसून, तो उत्तम  कवी सुद्धा आहे. कारण की, त्याने मुलींवर लिहीलेली एक कविता मुंबई येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सादर केली. यामध्ये शाहरुखने सांगितले की, प्रत्येक मुलगी ही आपआपल्या परीने सुंदर आहे.  ही कविता लिहीण्याची प्रेरणा त्याला गायक जयान मलिक यांच्यापासून मिळाली. लंडन येथे जयानशी त्याची भेट झाल्यावर त्यांनी मुलींविषयी एक खूप चांगली गोष्ट लिहीली होती. त्यामुळेच मला ही कविता लिहीण्याची प्रेरणा मिळाल्याचे शाहरुख म्हणाला. गतवर्षी एशियन अवॉर्डमध्ये शाहरुखने जयान मलिकसोबत सेल्फीही घेतला होता.तो सर्वत्र व्हायरलही झाला होता.