‘जब हॅरी मेट सेजल’च्या नव्या गाण्यात पहा शाहरूख खान, अनुष्का शर्माची केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 22:33 IST
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये शाहरूख आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
‘जब हॅरी मेट सेजल’च्या नव्या गाण्यात पहा शाहरूख खान, अनुष्का शर्माची केमिस्ट्री!
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये शाहरूख आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सुट्या एन्जॉय करण्यासाठी परिवारासोबत विदेशात गेलेल्या शाहरूखला नव्या गाण्यामुळे मुंबईत परतावे लागले. त्यामुळे या गाण्याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली होती. अखेर हे गाणे रिलीज झाले असून, इतर गाण्यांप्रमाणे हेही गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असेच काहीसे चित्र आहे. ‘हवाएं’ असे बोल असलेले हे गाणे रिलीज करताना शाहरूखने पत्रकार परिषदेला संबोधित केले. जेव्हा हे गाणे रिलीज झाले त्याचवेळी वरुण राजाने हजेरी लावल्याने शाहरूखच्या चेहºयावरील आनंद चांगलाच दिसून येत होता. पुढे हाच धागा पकडून त्याने पत्रकारांशी संवाद साधला. शाहरूखने म्हटले की, ‘हवाएं’ हे गाणे मी पावसातच रिलीज करू इच्छित होतो. कारण माझी अशी अपेक्षा होती की, सर्वांनी पावसात चिंब भिजत या गाण्याचा आनंद घ्यावा.’ गाण्याविषयी बोलताना शाहरूखने म्हटले की, हे गाणे खूपच मधुर आहे. गाण्याचे टायटल सध्याच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहे. त्याचबरोबर ‘हवाएं’ या गाणे खूपच चागंल्या पद्धतीने चित्रित केले आहे. या गाण्याची निर्मिती करण्यासाठी प्रीतम, इम्तियाज आणि इरशाद कामिल यांनी खूपच मेहनत घेतली. त्यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वासही शाहरूखने व्यक्त केला. दरम्यान, पत्रकार परिषदेत शाहरूखबरोबर दिग्दर्शक इम्तियाज अली, अनुष्का शर्मा आणि संगीतकार प्रीतम आदी उपस्थित होते. गाण्याविषयी इम्तियाजने म्हटले की, ‘हवाएं’ हे गाणे हॅरी आणि सेजल यांच्यातील नात्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे या चित्रपटातील पाचवे गाणे आहे. या अगोदर रिलीज करण्यात आलेल्या चारही गाण्यांना ज्याप्रमाणे प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, त्यावरून आम्ही आनंदी आहोत. या रोमॅण्टिक गाण्याचे शूटिंग बुडापेस्ट येथे करण्यात आले आहे. दरम्यान, ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे.