का मागितली शाहरूखने प्रितीची माफी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 13:48 IST
बॉलीवूडचा ‘किंग आॅफ रोमान्स’ शाहरूख खान याला कधी चिडलेलं पाहिलंय का? नाही ना..तरी त्याच्यावर बी टाऊनमध्ये ‘अॅरोगंट स्टार’ असा ...
का मागितली शाहरूखने प्रितीची माफी?
बॉलीवूडचा ‘किंग आॅफ रोमान्स’ शाहरूख खान याला कधी चिडलेलं पाहिलंय का? नाही ना..तरी त्याच्यावर बी टाऊनमध्ये ‘अॅरोगंट स्टार’ असा टॅग लागलेला आहे. पण, फार कमी जणांना ठाऊक आहे की, तो एक जंटलमॅन आहे. त्या माहिती असणाºया लोकांपैकी एक त्याची अनेक चित्रपटातील को-स्टार प्रिती झिंटा ही आहे.प्रिती त्याची खुप चांगली मैत्रीण देखील आहे. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटात शाहरूख खान आणि प्रिती झिंटा यांनी एकत्र काम केले होते.या चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्याने ‘दिल से’ च्या टीमला धन्यवाद देणारा व्हिडीओ सोशल साईट्सवर अपलोड केला. त्यात तो प्रितीचे नाव घ्यायचे विसरला. म्हणून त्याने प्रितीची माफी मागत तो व्हिडीओ पुन्हा एकदा पोस्ट केला.