Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहरुख-अनुगराग लवकरच एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:21 IST

किंग खान आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप दोघांनाही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत काम करायचे आहे. अनेक वेळा तसे त्यांनी बोलूनही दाखविले ...

किंग खान आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप दोघांनाही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत काम करायचे आहे. अनेक वेळा तसे त्यांनी बोलूनही दाखविले आहे.परंतु लवकरच हा योग जुळून येण्याचे संकेत आहेत. अनुरागच्या पुढच्या सिनेमात शाहरुखला कास्ट करण्यात येणार असून लवरच तो यासंदर्भात त्याच्याशी भेट घेणार आहे.अनुराग सांगतो, अनेक कथांवर चर्चा केल्यावर शेवटी एक कथा मला आवडली असून त्यामध्ये शाहरुखने काम करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातील त्याने मला वेळोवेळी खूप मदत केली असून तो भन्नाट अ‍ॅक्टर आहे.चित्रपटाच्या कथेवर तो सध्या काम करत असून पूर्ण झाल्यावर शाहरुखला ती ऐकवणार आहे. शाहरुख नोव्हेंबर महिन्यात गौरी शिंदेंच्या ‘डिअर जिंदगी’आणि जानेवरीत ‘रर्ईस’मध्ये दिसणार असून, आनंद एल राय व इम्तियाज अलीच्या सिनेमाची तो लवकरच शुटिंग सुरू करणार आहे.