शाहीदचा ‘सुपर हॉट’ अवतार..“coming soon”...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 21:56 IST
शाहीद कपूरच्या अलीकडे रिलिज झालेल्या ‘शानदार’ला मनासारखे यश मिळाले नाही. पण म्हणून प्रयोग करणे थांबवणार तो शाहीद कुठला! विशाल ...
शाहीदचा ‘सुपर हॉट’ अवतार..“coming soon”...
शाहीद कपूरच्या अलीकडे रिलिज झालेल्या ‘शानदार’ला मनासारखे यश मिळाले नाही. पण म्हणून प्रयोग करणे थांबवणार तो शाहीद कुठला! विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’मध्ये शाहीद काम करतोय. या शाहीदने एका सोल्जरची भूमिका साकारली आहे. काही मिनिटांपूर्वी शाहीदने इंस्टाग्राम एक सेक्सी स्टिल शेअर केले आहे.‘कमिंग सून’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. या फोटोतला शाहीदचा अवतार म्हणजे सुपर हॉट...लांब केस, वाढलेली दाढी आणि मिशी...हा लूक कुठल्या चित्रपटातील आहे, हे शाहीदने सस्पेन्स ठेवले आहे. कदाचित ‘उडता पंजाब’मधील शाहीदचा हा लूक असावा, असा अंदाज आहे. असे असेल तर ‘उडता पंजाब’वर तरूणींच्या उड्या पडणार, हे सांगायला नकोच...