शाहीदच्या बर्थडेची सिक्रेट प्लॅनिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 23:11 IST
हॅप्पी बर्थडे शाहीद!
शाहीदच्या बर्थडेची सिक्रेट प्लॅनिंग !
हॅप्पी बर्थडे शाहीद! २५ फेब्रुवारीला शाहीद कपूर ३५ वर्षांचा झाला असून लग्नानंतरचा हा त्याचा पहिला वाढदिवस आहे. काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, त्याची पत्नी मीरा त्याच्यासाठी बर्थडे पार्टीची सरप्राईज प्लॅनिंग करत आहे. पण, आता सुत्रांच्या माहितीनुसार कळते की, ते वाढदिवस स्पेशल करण्यासाठी एका अज्ञात ठिकाणी गेले आहेत. त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा म्हणून ते दोघेच कुणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते भारतातच असून नॉर्थ बाजूला अरूणाचल प्रदेश येथे गेले आहेत. शाहीद सध्या विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त आहे. वेल, वी होप द टू हॅव अ ग्रेट टाईम टूगेदर!