बॉलीवूडमध्ये यश काहींना खूप सहजासहजी मिळते तर काहींना आयुष्य घालवूनही प्रसिद्धीझोतात येता येत नाही.
‘हैदर’ आणि आता ‘उडता पंजाब’च्या यशाने सध्या जोमात असलेल्या शाहिद कपूरला दोन-तीन वर्षांपूर्वी एक ‘फ्लॉप अॅक्टर’ म्हणून ओळखले जायचे.
असे होण्यामागची कारणे त्याने प्रथमच सर्वांसोबत शेअर केली. तो म्हणतो, माझ्या करिअरमध्ये मी खूप चुका केल्या आहेत. चुकीच्या चित्रपटांची निवड केली आहे. म्हणून मला हवे तसे यश मिळवता येत नव्हते. प्रत्येक पडणाऱ्या चित्रपटासोबत माझा आत्मविश्वास कमी होत गेला. मी हताश झालो.
आता तुम्हीच सांगा की, ‘जब वुई मेट’ आणि ‘कमिने’ सारखे चांगले चित्रपट केल्यावर ‘दिल बोल हडिप्पा’सारखा सिनेमा केल्यावर करिअरची तर वाट लागणारच ना!
पण आता मी फिल्म निवडताना खूप विचार करतो. चांगली कथेवर माझा भर असतो. ज्या झाल्या त्या चुका पुन्हा न करण्याचा मी प्रयत्न करतो. चला, म्हणजे उशिरा का होईना पण शाहिदला समज आली.
शाहिद सांगतोय तो ‘फ्लॉप अॅक्टर’ होण्याची कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 11:58 IST