Join us

शाहीद म्हणतो,‘आता मी एकटा नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 10:35 IST

 शाहीद कपूरने नुकतेच त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पत्नी मीरा सोबत सेलिब्रेट केला. आता शाहीद लवकरच बाबा होणार आहे. त्याचा ...

 शाहीद कपूरने नुकतेच त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पत्नी मीरा सोबत सेलिब्रेट केला. आता शाहीद लवकरच बाबा होणार आहे. त्याचा एकटेपणा संपून लवकरच त्याच्या घरात बाळाचा आवाज घुमणार आहे. त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाला तो सुरूवात करतोय याचा त्याला प्रचंड आनंद होतोय.एक काळ होता ज्यावेळी तो अगदी एकटा एकटा राहायचा. त्या काळाविषयी बोलतांना तो म्हणाला,‘ माझा जेव्हा स्ट्रगलिंग काळ सुरू होता. तेव्हा मी केवळ एकटाच होतो. मला अ‍ॅवॉर्ड्स मिळायचे. त्यावेळी माझे आईवडील निलीमा अझीम आणि पंकज कपूर हे माझ्याभोवती असायचे. पण, असे कोणीच नव्हते ज्याच्याशी मी एखादी गोष्ट लगेचच शेअर करावी.प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिवलग व्यक्ती असतो ज्याच्यासोबत तो प्रत्येक बाब लगेचच शेअर करू शकतो. आता मीरा माझ्यासोबत प्रत्येक सेकंद असते. त्यामुळे मला तो एकटेपणा जाणवत नाही. तुमच्या प्रत्येक फिलिंगसाठी एक काळ असतो. त्यावेळी तुम्ही ते एन्जॉय करायला हवे.’