Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीद-मीराची ‘नौका पार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 09:39 IST

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे सध्या खुप आनंदात आहेत. पालक बनण्याचे सुख त्यांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे. ...

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे सध्या खुप आनंदात आहेत. पालक बनण्याचे सुख त्यांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे. मागील महिन्यातच शाहीदने सर्वांसमोर जाहीर केले की, तो लवकरच ‘बाबा’ होणार आहे.पालक होण्याअगोदर ते काही क्षण एकमेकांसोबत घालवू इच्छितात. शाहीदही ‘उडता पंजाब’ च्या चित्रीकरणात बिझी असल्याने मीराला फारसा वेळ देऊ शकला नाही. म्हणून सध्या ते ‘अमाल्फी’ येथे नौकेत बसून मस्त फेरफटका मारत आहेत.साशाने त्यांच्या या व्हॅकेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता शाहीद उडता पंजाबच्या प्रमोशनमध्ये  आणि रंगूनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.