Join us

शाहिद-मीरा लाँग ड्राईव्हवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 09:59 IST

 सध्या बॉलीवूडमध्ये शाहीद कपूर-मीरा राजपूत कपूर आणि सैफ अली खान-करिना कपूर खान या दोन्ही जोड्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ...

 सध्या बॉलीवूडमध्ये शाहीद कपूर-मीरा राजपूत कपूर आणि सैफ अली खान-करिना कपूर खान या दोन्ही जोड्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दोघांच्याही घरात नवा पाहुणा लवकरच येणार आहे. मीरा सप्टेंबरमध्ये त्यांच्या बाळाला जन्म देणार आहे तर करिना डिसेंबरमध्ये त्यांच्या बाळाला जन्म देईल.‘उडता पंजाब’च्या ट्रेलर रिलीज प्रसंगी शाहिदने तो बाबा होणार ही गुड न्यूज सोशल मीडियावर जाहीर केली होती. शाहिद नेहमी त्याची पत्नीला ‘बेबी वाईफ’ असे म्हणत असतो. तिच्यासोबतच तो लाँग ड्राईव्हवर गेला आहे. त्याने सोशल मीडियावर असे पोस्ट केले आहे की, तो त्याच्या छोट्याशा परीसोबतच वेळ घालवतो आहे.