चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त ‘पद्मावती’च्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग आहेत. हा चित्रपट महाराणी ‘पद्मावती’ यांच्यावर आधारित आहे. शाहिद त्याच्या भूमिकेसाठी सध्या खूप मेहनत घेत आहे. शिवाय तो या भूमिकेमुळे खूपच उत्साहित आहे. काही दिवसांपूर्वीच न्यू यॉर्क येथे झालेल्या आयफामध्ये शाहिदला ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत होता. विशेष म्हणजे यासाठी शाहिदने त्याच्या चाहत्यांचे जाहीर आभारही मानले होते.
दरम्यान, शाहिदकडे सध्या ‘पद्मावती’ हा एकच चित्रपट आहे. याविषयी जेव्हा त्याला विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले होते. तसेच जेव्हा शाहिदला ‘पद्मावती’च्या शूटिंगमधून वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या परिवाराला वेळ देण्यास प्राधान्य देतो. काही दिवसांपूर्वीच तो पत्नी मीरा राजपूतसोबत लंचसाठी जात असताना स्पॉट झाला होता. तसेच मुलगी मीशाबरोबरही तो नियमितपणे फोटोज् शेअर करीत असल्याने चर्चेत असतो.