Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहिद कपूरच्या आयुष्यात ‘या’ आकड्याचे आहे खास महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 15:23 IST

शाहिद कपूरची गणना आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यात होते. निश्चितपणे यामागे शाहिदचे अपार कष्ट आहेत. पण त्याशिवाय दैवाचा भागही आहेच. ...

शाहिद कपूरची गणना आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यात होते. निश्चितपणे यामागे शाहिदचे अपार कष्ट आहेत. पण त्याशिवाय दैवाचा भागही आहेच. तुम्ही माना वा मानू नका, पण शाहिदच्या आयुष्यात ७ हा आकडा विशेष आहे. हवे तर हा आकडा त्याचा लकी नंबर आहे, असेच म्हणा ना. या आकड्यासोबत त्याचे कनेक्शन अतिशय खास आहे. अगदी गाड्यांच्या क्रमांकपासून तर ७ जुलै या लग्नाच्या तारखेपर्यंत.शाहिदच्या जन्मापासून ७ व त्याचे कनेक्शन आहे. २५ नोव्हेंबर १९८१ रोजी शाहिदचा जन्म झाला. आता २५ या तारखेचे बेरीज केल्यास म्हणजेच २ अधिक ५ केल्यास तुम्हाला ७ हा आकडचाच मिळतो. शाहिदच नाही तर त्याची बेटर हाफ मीरा राजपूत हिच्यासाठीही ७ हा आकडा महत्त्वाचा आहे. कारण मीराचा जन्म ७ सप्टेंबरचा. म्हणजेच शाहिदला पत्नी मिळाली ती सुद्धा ७ तारखेला जन्मलेली. शाहिद व मीराचे लग्न झाले तेही ७ तारखेलाच. होय, ७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीरा यांचे लग्न झाले. यात योगायोग म्हणजे जुलै हा महिनाही सातवाच. आता हा खरोखरीच योगायोग होता की, शाहिदने जाणीवपूर्वक लग्नासाठी ७ ही तारिख निवडली, हे आम्हाला ठाऊक नाही. शाहिदचे लग्न झाले तेव्हा तो ३४ वर्षांचा होता आणि ३ व ४ ची बेरीज केल्यास पुन्हा ७ हाच आकडा येतो. त्याच्याकडे असलेल्या कारमध्ये ७ हा आकडा तुम्हाला हमखास दिसेलच. या सगळ्यावरून ७ या आकड्याचे शाहिदच्या आयुष्यात विशेष स्थान आहे, असे मानायला काहीही हरकत नाही. ALSO READ : शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चा खोळंबा!!