शाहिद कपूरने शेअर केली ‘मिशा’ची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:08 IST
Shahid kapoor share daughter meesha first Photo on social media ; मीडियादेखील मीशाचा फोटो प्रसिद्ध करण्यास आतूर आहे. मीशा कशी दिसते हे सर्वांनाच पहायचे आहे, मात्र आतापर्यंत शाहिदने मिशाला कॅमेºयाच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. आजही त्याने शेअर केलेला फोटो केवळ पायांचाच आहे हे विशेष.
शाहिद कपूरने शेअर केली ‘मिशा’ची पहिली झलक
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरला कन्यारत्न प्राप्त झाल्यापासूनच त्याची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. मात्र, मिशाचा एकही फोटो मीडियात आला नाही. आता खुद्द शाहिदनेच आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेता शाहिद कपूर आपल्या मुलीची खूप काळजी घेतोय. आपल्या मुलीला मीडियापासून विशेषत: मुंबईतील सेलिब्रेटींचा पाठलाग करणाºया पापाराझीपासून लपवत आला आहे आहे. मुलीच्या जन्मानंतर शाहिदने पत्नी मीरा राजपूतसह अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याच्या चाहत्यांना मुलगी मिशाची पहिली झलक कधी पाहता येणार याची उत्सुकता लागली होती. पण आता खुद्द शाहिदने तिचा एक फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिशाचे केवळ पाय दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने मिशू असा उल्लेख केला आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने २६ आॅगस्ट २०१६ रोजी एका गोंडस कन्येला जन्म दिला होता. या मुलीचे नाव मीरा राजपूत व शाहिद कपूरच्या आद्य अक्षरावरून ‘मिशा’ असे ठेवण्यात आले होते. जन्मापासूनच मिशाने शाहिदच्या चाहत्यांना वेड लावले आहे. मीडियादेखील मिशाचा फोटो प्रसिद्ध करण्यास आतूर आहे. मिशा कशी दिसते हे सर्वांनाच पहायचे आहे, मात्र आतापर्यंत शाहिदने मिशाला कॅमेºयाच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. आजही त्याने शेअर केलेला फोटो केवळ पायांचाच आहे हे विशेष. शाहिद कपूर याचा कंगना राणौत व सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला आगामी ‘रंगून’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुक ोणच्या नवºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ">http://