Join us  

'मी सुद्धा लहानपणी शारिरीक शोषण...' शाहीद कपूरने कबीर सिंहच्या ट्रोलिंगवर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 6:19 PM

शारिरीक शोषणाला प्रोत्साहन देणारा हा सिनेमा असल्याचं म्हणलं गेलं होतं.

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरने (Shahid Kapoor) २०१९ मध्ये 'कबीर सिंह' सिनेमात भूमिका केली होती. या भूमिकेनंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. शारिरीक शोषणाला प्रोत्साहन देणारा हा सिनेमा असल्याचं म्हणलं गेलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी शाहीदने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लहानपणी त्याने देखील शारिरीक शोषण होताना पाहिल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.

'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत शाहीद म्हणाला, 'लहानपणी मी शारिरीक शोषण होताना बघितलं आहे. मला माहितीए तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात. पण एक साधी मुलगी आणि टॅलेटेंड रागीट मुलाची ती एक गोष्ट आहे. नेहमीच्या जीवनात हे होत राहतं. माझ्या दृष्टीने प्रेमात काही खराब होत नाही का? प्रत्येक जण परफेक्ट आहे का? सगळ्यांनाच दुसरी संधी हवी असते.'

तो पुढे म्हणाला, 'तुम्ही सिनेमाच्या प्रोमोमध्येच पाहा सगळीकडेच असं सांगितलं आहे की तो एक डिस्टर्ब मुलगा आहे. त्याला प्रॉब्लेम्स आहेत. तो रागीट आहे. कुठेही तो चांगला मुलगा आहे असं दाखवलेलं नाही. त्याला समाज स्वीकारु शकत नाही. म्हणजेच ही अशाच मुलाची कहाणी आहे. मला वाटतं आयुष्यात खराब गोष्टीही होतात तर त्याही दाखवल्या पाहिजेत.'

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडकबीर सिंगट्रोलसोशल मीडिया