Shahid Kapoor Birthday : बॉलिवूडचा लव्हर बॉय शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा आज वाढदिवस. शाहिद कपूरला लव्हरबॉय का म्हणतात, हे नव्यानं सांगायची गरज नाही. त्याचं नाव अनेकींशी जुळलं, अर्थात प्रत्येक नातं फसलं. खरं तर शाहिद त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लव्ह अफेअर्समुळे अधिक चर्चेत राहिला. त्याची एक गाजलेली लव्हस्टोरी होती बेबोसोबतची. होय, सैफ अली खानशी लग्न करण्याआधी करिना कपूर (Kareena Kapoor)शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. करिना व शाहिदच्या लव्हलाईफची त्याकाळी भलतीच चर्चा होती. एकत्र काम करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अचानक दोघांत ब्रेकअप झालं. यानंतर करिनाने सैफ अली सोबत लग्न केलं आणि शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत संसार थाटला.
शाहिद व करिना एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. मग असं काय झालं की हे नातं तुटलं? तर खुद्द करिनाने या ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता.
ती म्हणाली होती, ‘ नशिबाचे स्वत:चे काही वेगळे प्लान असतात आणि आयुष्यात अनेक गोष्टी घडत जातात. जब वी मेट आणि टशन या चित्रपटादरम्यान दरम्यान अशा काही गोष्टी घडल्या की माझे आणि शाहिदचे मार्ग बदलले. त्यावेळी माझ्या आणि गीतच्या ( जब वी मेट या चित्रपटात करिनाने गीत नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.) आयुष्यात घडत असलेल्या अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यावेळी खासगी आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही सांभाळणं कठीण झालं होतं. जब वी मेटच्या सेकंड हाफमध्ये ज्याप्रमाणे गीतचं आयुष्य बदलतं त्याप्रमाणे माझंही आयुष्य बदललं. जब वी मेट आणि टशन हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास सिनेमे आहे. जब वी मेट या चित्रपटानं माझं आयुष्य बदललं तर टशन या सिनेमाच्या सेटवर मला सैफ भेटला.
2007 मध्ये ‘जब वी मेट’ रिलीज झाला होता. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्या नात्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. या सिनेमानंतर करिनाने ‘टशन’मध्ये काम केलं. यात सैफ आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यानंतर सैफ-करिनाने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. तर 2015 मध्ये शाहिदने मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली.