Join us  

Animal Park मध्ये 'कबीर सिंह'ची एन्ट्री होणार? शाहीद कपूर म्हणाला, 'असं होऊ शकतं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:30 AM

'कबीह सिंह' आणि 'रणविजय सिंह' एकत्र दिसणार का?

संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने 'कबीर सिंह', Animal या सिनेमांमधून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच छाप पाडली आहे. हिंसा, टॉक्झिक हिरो, शिव्या, इंटिमेट सीन्स असं सगळं काही तो आपल्या सिनेमात दाखवतो. त्याच्या सिनेमांवरुन मोठा वादही होतो मात्र तरी प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) 'कबीर सिंह' आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) Animal हे उत्तम उदाहरण. आता कबीर सिंह आणि रणविजय सिंह या दोघांना एकत्र आणलं तर? असं खरंच होऊ शकतं का हा प्रश्न खुद्द शाहीद कपूरलाच विचारण्यात आला. तेव्हा त्याने काय उत्तर दिलं जाणून घेऊया.

शाहीद कपूर सध्या त्याच्या आगामी 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमात तो आणि क्रिती सेननची जोडी जमली आहे. सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकाने शाहीदला विचारलं, 'कबीर सिंह आणि रणविजय दोघंही वांगा यांच्या आगामी Animal Park मध्ये दिसू शकतात का? यावर शाहीद म्हणाला, "या गोष्टी माझ्या हातात तर नाहीयेत आणि हे सोप्पंही नाही. याचं कारण म्हणजे दोन्ही भूमिका अगदीच वेगळ्या आहेत. पण असं झालं तर नक्कीच मजा येईल, पण हे शक्य आहे का? खरंच असं होऊ शकतं का? हे कधी होईल? या सर्व गोष्टींमागे प्रॅक्टिकल गोष्टीही आहेत."

तो पुढे म्हणाला, "या गोष्टी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या असू शकतात. पण हे जुळवून आणणं खरंच शक्य आहे का हा मोठा प्रश्नच आहे." असं झालं तर शाहीदलाही ते आवडेल अशी हिंटही त्याने यामधून दिली आहे. तसंच रणबीर आणि शाहीद पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्रही पाहायला मिळतील.

शाहीद कपूरचा 'तेरा बातो मे ऐसा उलझा जिया' 9 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. यामध्ये क्रिती सेनन रोबोट आहे. मात्र ही गोष्ट शाहीदला माहित नसते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. जेव्हा त्याला सत्य समजतं तेव्हा काय मजा येते याची ती गोष्ट आहे. प्रेक्षकांना सिनेमाचा ट्रेलर भलताच आवडला आहे.  

टॅग्स :शाहिद कपूररणबीर कपूरसिनेमाबॉलिवूड