Join us

कित्येक मॅसेज अन् फोन केल्यानंतर शाहिद कपूरने स्वीकारले होते करिना कपूरचे लव्ह प्रपोजल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 21:54 IST

‘पद्मावत’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. ...

‘पद्मावत’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. आज आम्ही शाहिद कपूरबद्दलचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक बॉलिवूडमध्ये बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांची लव्हस्टोरी अर्धवट राहिली आहे. परंतु सध्या ते त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. यातीलच एकेकाळची जोडी म्हणजे शाहिद कपूर-करिना कपूर होय. शाहिदने मीरा राजपूतसोबत ७ जुलै २०१५ मध्ये विवाह केला. मीरासोबत लग्न करण्याअगोदर शाहिद तब्बल तीन वर्ष करिना कपूर बरोबर रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘फिदा’ (२००४) या चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघांच्या लव्हस्टोरीचे वैशिष्ट्य म्हणजे करिनाने अगोदर शाहिदला प्रपोज केले होते. करिना आणि शाहिदची पहिली भेट ‘फिदा’ (२००४) च्या सेटवर झाली होती. शाहिदला बघून करिना एवढी इम्प्रेस झाली होती की, तिनेच शाहिदला अगोदर प्रपोज केले. याबाबतचा खुलासा स्वत: करिनानेच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. करिनाने म्हटले होते की, बºयाचदा फोन आणि मॅसेज केल्यानंतर शाहिदने तिचे प्रपोजल स्वीकारले होते. वास्तविक स्क्रिनवर दोघांच्या जोडीने फारशी कमाल केली नाही. परंतु रिअल लाइफमधील त्यांचे अफेअर इंडस्ट्रीत चांगलेच चर्चिले गेले. करिना कपूरने २००० या वर्षात इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. तर शाहिद कपूरने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पुढे २००४ मध्ये दोघे ‘फिदा’ या चित्रपटातून एकत्र आले. ‘फिदा’च्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली. त्यावेळी करिनाने इंडस्ट्रीत स्वत:चे भक्कम असे स्थान निर्माण केले होते. तिची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तर शाहिदने त्यावेळी इंडस्ट्रीत सुरुवात केली होती. अशातही करिना त्याला एवढी इम्प्रेस झाली होती की, तिने स्वत:हून त्याला प्रपोज केले होते.