Join us

​‘रंगून’नंतर शाहिदकडे नाही काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 18:59 IST

शाहीद कपूर सध्या ‘उडता पंजाब’च्या सक्सेस पार्टीत बिझी आहे. या चित्रपटात  साकारलेल्या ‘टॉमी सिंह’च्या भूमिकेसाठी शाहीदची जोरदार प्रशंसा होत ...

शाहीद कपूर सध्या ‘उडता पंजाब’च्या सक्सेस पार्टीत बिझी आहे. या चित्रपटात  साकारलेल्या ‘टॉमी सिंह’च्या भूमिकेसाठी शाहीदची जोरदार प्रशंसा होत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त शाहीद ‘रंगून’ या विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांच्या मते, येत्या काही दिवसांत या चित्रपटाचे शूटींग पूर्ण होईल. ‘रंगून’नंतर शाहीद दोन चित्रपट करणार होता. हे दोन चित्रपट त्याने साईन केले होते. मात्र कदाचित हे चित्रपट आताश: बनण्याची शक्यता नाही. सूत्रांच्या मते, या दोन्ही चित्रपटांच्या प्रॉडक्शन कंपन्यांनी तूर्तास शाहिदची मुख्य भूमिका असलेले चित्रपट लांबणीवर टाकले आहे. त्यामुळेच ‘रंगून’नंतर शाहीदकडे कुठलाही चित्रपट नसेल. अलीकडे एका पार्टीत पोहोचलेल्या शाहिदला त्याच्या आगामी सिनेमाबद्दल विचारले. यावर शाहिदने दिलेले उत्तरही काहीसे असेच होते. सध्या मी ‘रंगून’चे शूटींग करतोय. मात्र हे शूटींग संपल्यावर कदाचित माझ्याजवळ काम नसेल, असे वाटतेय, असे शाहिद म्हणाला. वेल शाहिद तुला लवकरच काम मिळो,शुभेच्छा !!