Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीदने घेतलायं ‘जज’ न बनण्याचा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 16:25 IST

छोट्या पडद्यावर बॉलिवूड कलाकारांचा वावर आता नवा राहिलेला नाही.अनेक बॉलिवूड कलाकार  वेगवेगळ्या  भूमिकांमध्ये छोट्या पडद्यावर दिसत आहेत. कुणी अभिनय ...

छोट्या पडद्यावर बॉलिवूड कलाकारांचा वावर आता नवा राहिलेला नाही.अनेक बॉलिवूड कलाकार  वेगवेगळ्या  भूमिकांमध्ये छोट्या पडद्यावर दिसत आहेत. कुणी अभिनय करतो आहे तर कुणी कुठल्याशा शोमध्ये जजची भूमिका बजावतो आहे. आपला शाहीद कपूर हा सुद्धा अलीकडच्या काळात एका रिअ‍ॅलिटी डान्स शोचा जज म्हणून दिसला. पण यापुढे कुठलाही डान्स शो जज न करण्याचा निर्णय शाहीदने घेतलायं म्हणे. कारण??? कारण जजच्या खुर्चीवर बसण्यास आपण लायक नाही, याचा साक्षात्कार म्हणे शाहीदला झालायं. कोण सर्वोत्कृष्ट आणि कोण नाही, हे ठरवण्याइतपत कदाचित मी मोठा झालेलो नाही. कारण मी स्वत:ही परिणूर्ण नाही. मी अद्यापही शिकतो आहे. जजपेक्षा मी होस्टिंग चांगले करतो. शिवाय यात मला मज्जाही येते. डान्स शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसून केवळ स्पर्धकांचा डान्स पाहण्यात फारसी मज्जा नाहीच. जावे अन् स्टेजवरच्या त्या स्पर्धकांसोबत मनसोक्त नाचावे, असेच मला वाटते. त्यामुळेच यापुढे कुठलाही डान्स शो जज न करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे शाहीदने म्हटलेय. शाहीदच्या या निर्णयामुळे त्याच्या तमाम चाहत्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. पण शेवटी शाहीदच्या निर्णयाचा सन्मान तर करावाच लागेल. होय ना!!