‘रईस’मध्ये शाहरुखच्या आई-वडिलांचीही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 20:30 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित रईस या चित्रपटाचे ट्रेलर लाँच केले. यावेळी त्याचे एक खास गुडलक ...
‘रईस’मध्ये शाहरुखच्या आई-वडिलांचीही भूमिका
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित रईस या चित्रपटाचे ट्रेलर लाँच केले. यावेळी त्याचे एक खास गुडलक सर्वांना माहिती झाले. रईसच्या ट्रेलर लाँच प्रसंगी शाहरुख फारच सहज दिसत होता. त्याच्या गळ्यात असलेले लॉकेट हे या कार्यक्रमात आकर्षण ठरले. या लॉकेटमध्ये त्याच्या आई-वडिलांचा फ ोटो होता. हे लॉके ट या ट्रेलर लाँचच्या वेळी चांगलेच चर्चेत आले. ‘रईस’ या चित्रपटातही तो हेच लॉकेट घालून दिसेल.कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात त्याच्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानचे करिअर घडविण्यात त्याच्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे तो मानतो. शाहरुख आपल्या आईला आपले लकी चार्म समजतो. शाहरु खची आई त्याला अभिनेता करू इच्छित होती. यामुळे ती नेहमीच शाहरुखला दिलीप कुमार यांच्या संबधित गोष्टी करण्याची मोकळीक देत होती. शाहरुखने दिलीप कुमारची फोटो खरेदी करावे, ते त्याने पाहावे व त्याच्यासारखा अभिनेता शाहरुख व्हावा असे तिला वाटत असावे असे शाहरुख मानतो. तिच्या मनातील इच्छेमुळेच शाहरुख आज बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ठ आहे असे शाहरुखला वाटते. यामुळे जेव्हा तो नव्या प्रोजेक्टची सुरुवात करीत करतो किंवा एखादी मोठी गोष्ट करीत असतो त्यावेळी त्याला आपल्या आईचा फोटो जवळ असावा असे वाटते. यामुळेच त्याने आपल्या लॉकेटमध्ये आई व वडिलांचा फोटो लावला आहे. शाहरुख खानच्या आगामी रईस या चित्रपटात तो हेच लॉकेट घालून दिसणार आहे. शाहरुख खानसाठी त्याचा आगामी ‘रईस’ हा चित्रपट महत्त्वाचा मानला जात आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काबिल’ या चित्रपटाशी शाहरुख खान अभिनित ‘रईस’ची टक्कर होणार आहे. यामुळे बॉक्स आॅफिसवर चांगलीच रंगत पहायला मिळले.