Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसणार इंटरनेट सेन्सेशन मल्लिका दुआ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 16:23 IST

भारताची सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि इंटरनेट सेन्सेशन मल्लिका दुआची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणा-यांसाठी मल्लिका ...

भारताची सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि इंटरनेट सेन्सेशन मल्लिका दुआची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणा-यांसाठी मल्लिका दुआ हे नाव नवे नाही. या व्यासपीठावर मल्लिकाचे कोट्यवधी चाहती आहेत. प्रसिद्धीच्या या शिखरावर असलेल्या मल्लिकासाठी  बॉलिवूडची कवाडेही उघडी झाली आहेत. आता बॉलिवूडचा किंगखान शाहरूख याने मल्लिकाला संधी दिली आहे. होय, शाहरूखच्या आगामी चित्रपटात मल्लिकाची वर्णी लागली आहे. शाहरूखच्या ‘झिरो’’ या चित्रपटात मल्लिका दिसणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर या चित्रपटात मल्लिका एक विशेष भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात ही विशेष भूमिका कुठली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तूर्तास तरी मल्लिकाच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यापूर्वी ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात मल्लिका दिसली होती. ‘द ट्रिप’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे. अभिनयक्षेत्रात येण्याआधी लेखिका अशीही तिची ओळख राहिली आहे़.ती पत्रकार विनोद दुआ यांची मुलगी आहे.या चित्रपटात मल्लिकाशिवाय सलमान खानही एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.त्याची भूमिकाही सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. यंदा ईदच्या मुहूर्तावर ‘झिरो’चे एक गाणे रिलीज केले जाणार आहे. या गाण्यात शाहरूख व सलमान दोघेही दिसणार आहेत.ALSO READ : ​अक्षय कुमारच्या ‘त्या’ कमेंटने भडकले मल्लिका दुआचे पापा! वाचा, सविस्तर घटना!!आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  श्रीदेवींनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअर्थाने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. येत्या  २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.