बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळविले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो आहे. सध्या शाहरूख खान कठीण काळातून जात आहे. त्याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात तुरूंगवास झाला आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्य चिंतेत आहेत. शाहरूख खान आपल्या मुलाला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सध्या हे कुटुंब लाइमलाइटपासून दूर आहे. तसेच शाहरूख खानच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे जो लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. ही व्यक्ती म्हणजे किंग खानची बहिण शहनाज लालारूख.
शाहरूखची बहिण ६१ वर्षांची आहे. शहनाज लालारूखच्या जीवनात एक काळ असा आला होता जेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. वडिलांना मृतावस्थेत पाहून तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. शाहरूखच्या वडिलांचे १९८१ साली कॅन्सरने निधन झाले होते. असे सांगितले जाते की त्याबद्दल शहनाज लालारूखला माहित नव्हते. त्यावेळी ती कुठेतरी बाहेर गेली होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा त्यांचे पार्थिव पाहून बेशुद्ध झाली होती. या घटनेनंतर तिला खूप मानसिक धक्का बसला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर ती सातत्याने आजारी राहू लागली.