Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘यश चोप्रा मेमोरिअल अ‍ॅवॉर्ड’साठी शाहरूख खानची निवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:49 IST

सुपरस्टार शाहरूख खान याने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह ‘मोहब्बतें’,‘दिल तो पागल हैं’,‘वीर-झारा’,‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ...

सुपरस्टार शाहरूख खान याने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह ‘मोहब्बतें’,‘दिल तो पागल हैं’,‘वीर-झारा’,‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलिवूडला मिळवून दिले. म्हणून ‘बॉलिवूड लिजेंड’ यश चोप्रा यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या ‘यश चोप्रा मेमोरिअल अ‍ॅवॉर्ड’ साठी शाहरूख खानची निवड करण्यात आली. यश चोप्रा यांची पत्नी पामेला, निर्माता बोनी कपूर, सिमी गारेवाल, पद्मिनी कोल्हापुरी, सुब्बारामी रेड्डी, एनी आणि शशी रंजन या परीक्षकांच्या उपस्थितीत निवड झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आलेय. हा सन्मान लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या हस्ते २५ फेबु्रवारीला देण्यात येणार आहे. शाहरूखच्या निवडीची दोन कारणं पामेला यांनी सांगितली, ‘ शाहरूख यश चोप्रांच्या अत्यंत जवळचा होता. त्याने चोप्रांसोबत केलेले चारही चित्रपट हे बॉक्स आॅफिसवर बिग हिट ठरले. त्यानंतरच शाहरूखला खऱ्या अर्थाने त्याचे आजचे स्थान अनुभवता आले.’  हा अ‍ॅवॉर्ड बॉलिवूड इंडस्ट्रीत आपण ज्यांना आदर्श मानतो अशा कलाकारांना देण्यात येतो. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि आता शाहरूख खान. शाहरूख आणि यश चोप्रा यांचं नातंच काही और होतं.’ शाहरूख खान हा सध्या दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘द रिंग’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून, अनुष्का शर्मासोबत तो या चित्रपटातून तिसऱ्यादा दिसणार आहे. तसेच त्याचा आगामी चित्रपट ‘रईस’ मुळे तो चर्चेत आहे. ‘रईस’ कडून शाहरूखला खूप अपेक्षा आहेत. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिला करण्यात येणारा विरोध चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळवून देतो, हे आता वेळच सांगू शकेल.