Join us

Shocking : शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस'च्या निर्मात्याची मुलगी कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णालयात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 11:50 IST

आणखी 9 लोकांची टेस्ट करण्यात आली आहे.

 भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. बॉलिवूड निर्मात्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार 'रा वन' आणि चेन्नई एक्सप्रेस सारख्या सिनेमांची निर्माती केलेल्या करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. 31 वर्षीय शजावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.  तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

 मोरानी  जुहूमध्ये राहतात. महापालिका कर्मचारी लवकरच त्यांच्या घराला सॅनिटाईज करणार आहेत. रिपोर्टनुसार मोरानी यांचं घर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या बिल्डिंगमध्ये एकूण नऊ लोक राहतात. त्यासगळ्यांची देखील टेस्ट करण्यात आली आहे.

 मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहरुख खानसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. शाहरुखच्या अनेक सिनेमांचे ते निर्माते आहेत. 2015 मध्ये आलेल्या 'दिलवाले' सिनेमाची निर्मिती देखील त्यांची केली होती.  

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपोययोजना सुरु आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशाहरुख खान