शाहरुख खान म्हणाला, माझे वय आता रोमँटिक चित्रपटासाठी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 19:28 IST
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा केली जात असतानाच शाहरुख ...
शाहरुख खान म्हणाला, माझे वय आता रोमँटिक चित्रपटासाठी नाही!
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा केली जात असतानाच शाहरुख खानने आश्चर्याचा धक्का देणारे विधान केले आहे. ‘रईस’च्या प्रमोशनानिमित्त मुंबई ते दिल्ली असा रेल्वे प्रवास करताना मीडियाच्या निवडक पत्रकारांशी त्याने चर्चा केली. शाहरुख म्हणाला, आता माझे वय रोमँटिक भूमिका करण्याचे राहिले नाही. बॉलिवूडमध्ये ‘किंग आॅफ रोमांस’ या नावाने ओळख मिळविणारा शाहरुख खान म्हणाला, आता बॉलिवूडमध्ये रोमांसची व्याख्या बदलली आहे. अशा वेळी जेव्हा मी ५१ वर्षांचा आहे त्यानुसार मला बदलण्याची गरज असल्याचे जाणविते. रोमांस करताना त्यात एक लहानशी औपचारिकता आवश्यक असते. त्यात एक संस्कार हवा असतो. मग ते गुडघ्यावर बसणे असो किंवा मुलीच्या प्रसंशेत केलेली शायरी असो, मी आजही अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. Read More : style war between raees and kabil : हृतिक रोशन स्टाईलमध्ये शाहरुख खानला पछाडणार?शाहरुख खानने आपल्या चित्रपटातून वेगवेगळ्या पद्धतीच्या रोमँंटिक भूमिका साकारल्या आहेत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कु छ होता है, कभी खुशी कभी गम या सारख्या सुपरहिट रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाºया शाहरुख खानने मागील काही वर्षांत आपला रोमँटिक जेनर चेंज केला आहे. ‘रईस’ या चित्रपटातून शाहरुखचे नवे रूप त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. अशावेळी शाहरुख म्हणाला, रोमांस हा औपचारिकच असावा. ‘और फिर क्या कर रही है’ या अंदाजात तो असूच शकत नाही, यात समानतेचा भाव असावाच. शाहरुख म्हणाला, मला वाटते की, मी आता रोमँंटिक चित्रपटासाठी मोठा झालो आहे, असेही असू शकते की आजचा युवक रोमांसची नवी व्याख्या शोधू शकेल, अर्थातच यात औपचारिकता असेल आणि आजच्या काळाची भाषाही त्यात असेल. कदाचित इम्तियाज अली दिग्दर्शित नवा चित्रपट यावर अधिक प्रकाश टाकणारा ठरू शकतो. यात औपचारिकतेचा भाग असू शकतो असेही तो म्हणाला. Read More : शाहरुख खानला वाटत नाही स्टारडमची भीतीइम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे. आलिया भट्टसोबतच्या डिअर जिंदगी या चित्रपटात शाहरुखने लव्ह मेंटोरची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेची प्रशंसाही झाली होती. आता शाहरुखने रोमँटिक भूमिकांसाठी नकार दिल्यामुळे तो अधिक आव्हानात्मक भूमिकेत दिसणार, असे म्हणायला हरकत नाही. रईस याची सुरुवातच म्हणायला हवी. ALSO READ शाहरुख खानला स्क्रीप्ट आवडूनही ‘यामुळे’ रखडतोय साहिर लुधियानवी बायोपिक'Raees' सिनेमाप्रमाणेच 'या'बॉलिवूड सिनेमांचेही झाले ट्रेनने प्रवास करत प्रमोशन