Join us

आराध्या बच्चनने दिले या विषयावर दमदार भाषण, शाहरुख खानने ही केले रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 15:06 IST

काही तासांच्या आताच आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनचा सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होताना दिसातोय.  गेल्या शुक्रवारी आराध्याचे शाळेचे अ‍ॅन्युअल फंक्शन झाले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीय उपस्थित होते.  या व्हिडीओत आराध्या पावरफुल संदेश देताना दिसतेय. 

या व्हिडीओत आराध्या म्हणतेय, मी एक मुलगी आहे, मी स्वप्न आहे नव्या युगाचे. मी नव्या जगात जगणार ज्याठिकाणी मी सुरक्षित जीवन जगता येईल. माझ्यावर प्रेम केले जाईल. मला सन्मानाने  वागवले जाईल. एक असे जग जेथे माझा आवाज अहंकाराकडे दुर्लक्ष करून गप्प बसणार नाही, परंतु ज्ञानाच्या आकलनाने ऐकला जाईल. असे जीवन जिथे जीवनाच्या पुस्तकातून ज्ञान मिळेल.

आराध्याचा या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओत आराध्या खूप एक्सप्रेसिव्ह दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर एग्रेशन पाहायले मिळते आहे. हा परफॉर्मेन्स देताना आराध्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. अभिषेक बच्चनच्या बाजूला शाहरुख खान बसलेला दिसतोय. तो देखील आराध्याचे भाषण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करताना दिसतो आहे.  आराध्या ही बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. आराध्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच व्हायरल होऊ लागतात. बच्चन आराध्याची प्रचंड काळजी घेते. ऐश्वर्या जिथे जाईल तिथे आराध्या तिच्यासोबत असते. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन