Join us
Daily Top 2Weekly Top 5

मन्नतच्या बाल्कनीत किंग खानची सिग्नेचर पोज, चाहत्यांनी केला एकच जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:57 IST

किंग खान शाहरुख आज मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांची भेट घेतली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

बॉलिवूडचा बादशाह म्हणुन ओळख असलेला शाहरुख खान याने पुन्हा बॉलिवूडवरील त्याच वर्चस्व सिद्ध केलं.  त्याच्या 'जवान'ने अनेक रेकॉर्ड तोडले. 'जवान' रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये शाहरुखच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. काही ठिकाणी चाहते थिएटरमध्ये नाचत आहेत, तर काही ठिकाणी फटाके फोडले जात आहेत.

 चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम आणि प्रतिसाद पाहून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही. आज सुपरस्टार मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांची भेट घेतली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये किंग खान बाल्कनीमध्ये सिग्नेचर पोज देताना दिसत आहे.

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याखाली चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुख खानही चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अचानक मन्नतच्या बाल्कनी आला. शाहरुखला पाहताच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला.  शाहरुखने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेली दिसून आली. चाहत्यांना फ्लाइंग किस देताना दिसला. एवढेच नाही तर किंग खानने चाहत्यांना हात जोडून अभिवादनही केले. शाहरुखने वारंवार सर्व चाहत्यांचे हात जोडून त्यांच्या अफाट प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले.  शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 जर आपण वर्ल्ड वाइड कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपटाने रिलीजच्या 11 व्या दिवशी 800 कोटींचा कलेक्शन ओलांडला आहे. अॅटली दिग्दर्शित जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.  या चित्रपटात शाहरुख, विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत होते. तर, या चित्रपटात दीपिकाचा कॅमिओ होता. याशिवाय सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर, प्रियामणी, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

शिवाय, जवान या ब्लॉकबास्टरनंतर शाहरुख खानचा राजकुमार हिराणीसोबतचा डंकी हा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द किंग खानने एका कार्यक्रमात ही माहिती दिली. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट एक इमोशनल-कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. डंकी हा चित्रपट तीन महिन्यांनंतर म्हणजेच 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपटबॉलिवूडसेलिब्रिटी