Join us

शाहरूख खानला आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे आमंत्रण; विद्यार्थ्यांना ‘या’ विषयावर देणार लेक्चर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 21:56 IST

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान याचे फॅन्स फॉलोअर जगभरात आहेत. त्यामुळेच त्याला जगातील प्रसिद्ध आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रिन्सिपलने आमंत्रण ...

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान याचे फॅन्स फॉलोअर जगभरात आहेत. त्यामुळेच त्याला जगातील प्रसिद्ध आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रिन्सिपलने आमंत्रण दिले आहे. होय, आॅक्सफोर्डचे प्रिन्सिपल एलन रसिब्रगरने शाहरूखला त्याचे अनुभव विद्यार्थ्यांशी कथन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. आॅक्सफोर्डने काही दिवसांपूर्वीच त्याला हे आमंत्रण दिले असून, शाहरूख विद्यार्थ्यांसमोर त्याचे अनुभव शेअर करणार आहे. यासाठी तो लवकरच आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाणार असून, विद्यार्थ्यांना एक लेक्चर देणार आहे. शाहरूखच्या या लेक्चरचे वैशिष्ट्य म्हणजे शाहरूख स्वत: हे स्पीच लिहिणार आहे. मुलांशी मनमोकळा संवाद साधता यावा या एकमेव हेतूने त्याने स्वत:च स्पीच लिहिण्याचा विचार केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने म्हटले की, ‘माझे स्पीच इतर कोणी लिहावे हे मला आवडणार नाही. खरं तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. परंतु अशातही आॅक्सफोर्डमध्ये जाण्याअगोदर स्पीच लिहिणार आहे. वास्तविक मला अद्यापपर्यंत कुठलीच आयडिया नाही की, मी कोणत्या विषयावर स्पीच लिहायला हवे. मात्र काहीही असो, मी पूर्ण तयारीनिशी जाणार आहे. खरं तर शाहरूखला एखाद्या विद्यापीठाने लेक्चरकरिता बोलावियाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील २०१२ मध्ये त्याला ‘याले युनिव्हर्सिटी’मध्ये स्पीच देण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी शाहरूख विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच रमला होता. असाच काहीसा प्रसंग पुन्हा एकदा बघावयास मिळणार आहे. असो, सध्या शाहरूख त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे दर दोन दिवसाआड मिनी ट्रेलर रिलीज केले जात आहे.