Join us  

Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:02 PM

Pathaan Teaser Out : अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए...  , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अ‍ॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय आणि त्याच्या वाढदिवशी ‘पठान’चा टीझर रिलीज झाला आहे. होय, शाहरूखने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना मोठी ट्रिट देत, ‘पठान’चा टीझर रिलीज केला.टीझरमध्ये शाहरूखसोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone ) आणि विलेन जॉन अब्राहमची (John Abraham) झलक पाहायला मिळते. टीझरमध्ये असे काही अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळतात की, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए...  , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अ‍ॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे. शाहरूख यात फुल्ल ऑन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतोय. हा टीझर बघता, एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे ‘पठान’च्या निमित्ताने शाहरूख चाहत्यांना एक मोठ्ठ सरप्राईज देणार आहे. आत्तापर्यंत कधीही न पाहिलेला शाहरूख या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

दीपिका पादुकोण टीझरमध्ये अगदी काही सेकंदापुरती दिसते. पण या काही सेकंदातही शाहरूख व दीपिकाची केमिस्ट्री पाहून फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दोघांमधील इंटेन्स रोमान्स जबरदस्त आहे.  ओम शांती ओम आणि  चेन्नई एक्सप्रेस  या चित्रपटांमधील शाहरूख आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘पठान’ या चित्रपटात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘पठान’ हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचा बजेट 250 कोटी रूपये आहे.पठाण या सिनेमात काम करण्यासाठी शाहरूखनं 85 कोटी मानधन घेतलं आहे. 

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमादीपिका पादुकोणजॉन अब्राहमबॉलिवूड