Join us

शाहरूखने बनवले चाहत्यांना ‘फूल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 08:58 IST

अभिनेता शाहरूख खान याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ लवकरच त्याच्या फॅन्सच्या भेटीला येणार आहे. १५ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार ...

अभिनेता शाहरूख खान याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ लवकरच त्याच्या फॅन्सच्या भेटीला येणार आहे. १५ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार असून सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशन करण्यात कुठलीच कसर शाहरूख सोडत नाहीये. सर्वप्रथम त्याने चित्रपटाचे गाणे हंसराज कॉलेज येथे रिलीज केले.जेथे तो शिकला होता. त्यानंतर मुंबईच्या यशराज फिल्म्स स्टुडिओज येथे फॅनचा ट्रेलर रिलीज केला. काल ‘फूल डे’निमित्ताने त्याने काही व्हिडिओ शेअर केले. ज्यामुळे त्याचे फॅन्स ‘फूल’ बनले आहेत. त्याच्या फॅन्सनी त्याला काही चॅलेंजेस दिले होते. ते त्याला पूर्ण करायचे होते. अत्यंत फनी आणि मस्तीने भरपूर असे हे व्हिडिओज आहेत. त्यानेही हे आव्हान स्विकारून त्याला देण्यात आलेले चॅलेंज पूर्ण केले.‘ओम शांती ओम’ मधील ‘एक चुटकी सिंदूर ’ सीन त्याने साकारला. तसेच त्याला हात न लावता केक खायला सांगितला होता. त्याने एका मुलाला बोलवून त्याच्या हाताने केक खाल्ला. वेल, शाहरूख तर किंग आहे. असे भलते सलते पर्याय त्यालाच उपलब्ध होऊ शकतात. शेवटी काय तर, एप्रिल फूल बनाया, तो फॅन्स को गुस्सा नही आया.....!’ }}}}}}}}}}}}}}}}}}}}