शाहरूख खान अन् सलमान खानच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियावर धूम; कोणत्या बरं चित्रपटाची शूटिंग करीत असतील, घ्या जाणून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 20:56 IST
शाहरूख खान अन् सलमान खान या दोघांचा शूटिंगच्या एका फोटोने सध्या धूम उडवून दिली असून, सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाहरूख खान अन् सलमान खानच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियावर धूम; कोणत्या बरं चित्रपटाची शूटिंग करीत असतील, घ्या जाणून!
सध्या बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्यातील मैत्री चांगलीच वाढताना दिसत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या सलमानच्या ‘ट्यूबलाइट’मध्ये तर शाहरूख कॅमिओ करताना बघावयास मिळाला होता. त्यामुळे या दोघांनी लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करावी, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूखने सलमानसोबत २०२० पर्यंत तरी काम करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र शाहरूख सलमानच्या चाहत्यांना २०२० अगोदरच या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना बघावयास मिळणार आहे. होय, आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरूख प्रमुख भूमिकेत असून, सलमान त्यामध्ये कॅमिओ करताना दिसेल. त्यांच्या शूटिंगच्या एका फोटोने सध्या धूम उडवून दिली असून, सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमानच्या ‘ट्यूबलाइट’मध्ये शाहरूखने गोगो पाशा या जादूगाराची छोटीशी भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही केले गेले. आता सलमानही मित्र शाहरूखसाठी त्याच्या चित्रपटात असाच काहीसा जलवा दाखविताना दिसणार आहे. आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरूख मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. तर सलमान यामध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमानने नुकतेच या चित्रपटाच्या सेटवर भेट देऊन आपल्या वाट्याची शूटिंग केली. सेटवरील सलमान आणि शाहरूखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हे दोघे नेमके कोणत्या चित्रपटाची शूटिंग करीत आहेत, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. फोटोमध्ये शाहरूख आणि सलमानसोबत आनंद एल. रॉयदेखील दिसत आहेत. फोटोमधील दोन्ही सुपरस्टार्सचा जलवा पाहता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील, यात शंका नाही. या चित्रपटातील एका गाण्यात हे दोघे झळकणार आहेत. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे रेमो डिसूझा कोरिओग्राफ करणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चिला जात आहे. चित्रपटात शाहरूखसह अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफही प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. असो, शाहरूखला बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत बघायला त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. वीएफएक्स पद्धतीद्वारे शाहरूखला पडद्यावर बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दाखविण्यात येणार आहे. शिवाय तो पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारत असल्याने त्याच्या चाहत्यांना त्याला अशा भूमिकेत बघणे मजेशीर ठरेल. शिवाय सलमानचा कॅमिओही आकर्षक ठरणार आहे.