संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात दिसणार शाहरुख खान व ऐश्वर्या राय बच्चन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 22:05 IST
दीपिका पादुकोण, शाहिद कपूर व रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या संजय लीला ...
संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात दिसणार शाहरुख खान व ऐश्वर्या राय बच्चन!
दीपिका पादुकोण, शाहिद कपूर व रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा शाहरुख खान व ऐश्वर्या राय एकत्र दिसणार असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटात पंजाबी कवियत्री-लेखिका अमृता प्रीतम यांची भूमिका ऐश्वर्या राय साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय लीला भन्साळी हे उर्र्दू व हिंदीतचे महान कवी साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी करीत असून यासाठी कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. संजय लीला भन्साळी यांनी साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला पसंती दिली असून अमृता प्रितम यांच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चन हिच्यानावाला पसंती दिली आहे. या चित्रपटाचे नाव गुस्ताखिया असे असू शकते असेही सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या राय व शाहरुख खान हे सुमारे १५ वर्षांनतर एकत्र येणार आहेत. यापूर्वी शाहरुख आणि ऐश्वर्या यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय दोघांनी मोहब्बते व जोश या चित्रपटातही एकत्र दिसले होते. शाहरुखच्या एका चित्रपटात ऐश्वर्या राय काम करीत असल्याचे समजल्याने सलमान खानने सेटवर धिंगाणा घातला होता. यामुळे शाहरुख व सलमानमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. दरम्यान दोघांत बरेच काही घडून गेले आहे. करण जोहरच्या ए दिल है मुश्किल या चित्रपटात शाहरुख खान हा ऐश्वर्या राय यांच्या पतीच्या भूमिकेत दिसला होता मात्र ही भूमिका फारच छोटी होती. आता पुन्हा एकदा दोन्ही कलाकार एकाच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे दिसते. या चित्रपटाच्या विषयी सांगायचे झाले तर लाहोर येथील कॉलेजमध्ये साहिर लुधियानवी व अमृता प्रीतम यांची भेट झाल्यावर दोघांत प्रेमाकुर फुलले होते. साहिर मुसलमान व अमृता सिख असल्याने मोठा वाद झाला होता. साहिर व अमृता प्रीतम यांनी आपल्या जुण्या नात्याबद्दल नेहमीच आपली क बुली दिली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा व भारत पाक विभाजन हा देखील त्यांच्या साहिर व अमृता प्रीतम यांच्यान जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.