Join us

‘ओके जानू’च्या पोस्टरमध्ये श्रद्धा-आदित्यची केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:04 IST

तुम्ही आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. ‘ओके जानू’ चित्रपटाचे पोस्टर ...

तुम्ही आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. ‘ओके जानू’ चित्रपटाचे पोस्टर केव्हा लाँच होते, याची प्रतीक्षा चाहते आत्तापर्यंत करत होते. मात्र, आता त्यांची प्रतीक्षा संपलीय. करण जोहरने नुकतेच चित्रपटाचे पोस्टर लाँच करून सोशल मीडियावर चाहत्यांना दिलासा दिलायं. या पोस्टरमध्ये आदित्य-श्रद्धा यांची केमिस्ट्री दिसून येतेय. ‘आशिकी २’ नंतर ही जोडी पुन्हा एकदा ‘ओके जानू’ मध्ये एकत्र दिसेल.दिग्दर्शक शाद अली यांच्या बहुचर्चित चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. ‘ओके कन्मनी’ या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक असल्याने प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पोस्टरमधून आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री पहावयास मिळतेय. आदित्य श्रद्धाला किस करत असून ती मात्र त्याला किस करण्यापासून थांबवण्याच्या प्रयत्नात आहे. ‘फिगर आऊट कर लेंगे’ ही टॅगलाईन पोस्टरवर दिसून येतेय. श्रद्धा कपूरनेही हे पोस्टर तिच्या वैयक्तिक अकाऊंटवर शेअर करून ‘अ‍ॅण्ड वी आर बॅक!! १३ जाने.ओके जानू.’ असे कॅप्शन दिलेय. दिग्दर्शक मनी रत्नम यांच्या तमीळ ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’ चा ‘ओके जानू’ हा आॅफिशियल रिमेक असून शाद अली यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘लाईव्ह इन रिलेशनशिप’ कथानकावर आधारित हा चित्रपट असून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये येणारे उतार-चढाव चित्रपटात पहावयास मिळतील.