Join us

‘जग्गा जासूस’मधील सयानी गुप्ताचा लूक बघाल तर दंग व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 21:04 IST

सुरुवातीला अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील बिनसलेल्या संबंधांमुळे रखडलेला सिनेमा ‘जग्गा जासूस’ आता रिलिजिंग डेटवरून चर्चेत आला आहे.

सुरुवातीला अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील बिनसलेल्या संबंधांमुळे रखडलेला सिनेमा ‘जग्गा जासूस’ आता रिलिजिंग डेटवरून चर्चेत आला आहे. कारण या सिनेमाच्या रिलिजिंग डेटवर जबरदस्त सस्पेन्स असून, हा सिनेमा नेमका केव्हा रिलिज होईल याची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. दरम्यान, या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सयानी गुप्ता हिचा सिनेमातील लूक समोर आला असून, ते बघून सगळेच दंग राहिले आहेत. ३१ वर्षीय सयानी गुप्ता सिनेमात १४ वर्षाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिला या भूमिकेसाठी स्वत:च्या लूकवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली. विशेष म्हणजे त्यात ती पूर्णत: यशस्वी ठरली असून, सयानीचा हा लूक खरोखरच कौतुकास्पद आहे. अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सयानी १४ वर्षाच्या स्कूल गर्लच्या भूमिकेत आहे. रणबीर कपूरची मैत्रीण दाखविलेल्या सयानीने या भूमिकेला पूर्णत: न्याय दिला आहे. सयानी या अगोदर शाहरूख खान याच्या ‘फॅन’ आणि नुकत्याच रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी-२’मध्ये झळकली होती. ‘जॉली एलएलबी-२’ मधील तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. दरम्यान, सयानी स्वत: ‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्या रिलिजविषयी उत्सुक आहे. कारण सिनेमातील तिने केलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद ठरेल असा तिला विश्वास आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला असून, त्यामध्ये कॅट आणि रणबीरची जुगलबंदी बघावयास मिळत आहे.