Join us

‘सुलतान’च्या नावे सात रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 22:29 IST

 ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले सलमान खानचे चित्रपट काही ना काही कमाल करतात. काल बुधवारी रिलीज झालेला  ‘सुलतान’नेही अशीच कमाल ...

 ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले सलमान खानचे चित्रपट काही ना काही कमाल करतात. काल बुधवारी रिलीज झालेला  ‘सुलतान’नेही अशीच कमाल केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सात रेकॉर्ड कायम केले.१. ईदला सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपटईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘सुलतान’ने पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करून रेकॉर्ड केला. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास ४० कोटींचा गल्ला जमवला. गतवर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ने पहिल्या दिवशी २७.२५ कोटी कमाई केली होती. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या शाहरूखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ने ३३.१ कोटी कमाई केली होती. पण आता ‘सुलतान’ने या चित्रपटाला मागे टाकले.२. यंदाचा सर्वाधिक मोठा ओपनर चित्रपट‘सुलतान’ या वर्षांचा सर्वाधिक मोठा ओपनर चित्रपट ठरला. यावर्षी आलेला शाहरूखच्या ‘फॅन’ला ‘सुलतान’ने मागे टाकले.३. अ‍ॅडव्हान्स बुकिंग : अ‍ॅडव्हान्स बुकींगच्या बाबतीतही ‘सुलतान’ने रेकॉर्ड कायम केला. रिलीजच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच ‘सुलतान’चे अ‍ॅडव्हान्स बुकींग सुरु झाले. रिलीज होण्यापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकींगच्या माध्यमातून ‘सुलतान’ने २० कोटीची कमाई करून टाकली.४. बुधवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटबुधवारी रिलीज होणारा ‘सुलतान’सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. यापूर्वी सलमानचाच ‘एक था टायगर’ बुधवारी रिलीज झाला होता. सामान्यत: या दिवशी कुठलाच चित्रपट रिलीज होत नाही. मात्र ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले हे दोन्ही सिनेमे सुपरडूपर हिट ठरले.५. स्पोर्ट चित्रपटांमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा चित्रपटआत्तापर्यंत स्पोर्टवर अनेक सिनेमे आलेत. यात ‘सुलतान’ने पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड कायम केला. ‘सुलतान’ या बाबतीत ‘चक दे इंडिया’, भाग मिल्खा भाग, मेरी कॉम सारख्या चित्रपटांना मागे सोडले.६. सर्वाधिक चांगला रिव्ह्यू मिळवणारा सलमानचा चित्रपट‘सुलतान’ केवळ प्रेक्षकांनाच भावला नाही तर समीक्षकांनाही भावला. सलमानच्या आत्तापर्यंतच्या कुठल्याही चित्रपटाला समीक्षकांनी इतका चांगला प्रतिसाद दिलेला नव्हता. ‘सुलतान’मात्र याबाबतीही सरस ठरला.७. यंदाचा सर्वाधिक हाऊसफुल सिनेमालोकांनी आधीच ‘सुलतान’ची बुकींग केली होती. त्यामुळे पहिल्यादिवशी चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले.