इरफानच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानला जॉन्डिस झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला होता. यामुळे इरफानला त्याच्या ‘ब्लॅकमेल’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन थांबवावे लागले होते. त्याच्या अन्य चित्रपटांचे शूटींगही थांबवण्यात आले होते.
‘सलाम बॉम्बे’,‘फुटपाथ’,‘साढे सात फेरे’,‘बिल्लू’,‘पीकू’, ‘मदारी’, ‘पान सिंह तोमर’, ‘लाईफ इन मेट्रो’,‘लाईफ आॅफ पाय’, ‘हिंदी मीडियम’ यासारख्या चित्रपटांत इरफान दिसला आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जाणाºया इरफानचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. त्याच्या आजारपणाच्या बातमीने साहजिकच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. चाहत्यांच्या सगळ्या सदिच्छा, प्रेम त्याच्यासोबत आहेत. आमच्याही सदिच्छा इरफानसोबत आहेत. अनेक संघर्षानंतर इरफान इथपर्यंत पोहोचला आहे. या संकटातूनही तो सहीसलामत बाहेर पडेल, अशी कामना करू यात.
ALSO READ : ...म्हणून इरफान खान शूटिंग अर्धवट सोडून घरी गेला
इरफान अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ सिरिजच्या 'द मिनस्ट्री'मध्ये दिसणार आहे. यानंतर तो विशाल भारव्दाजच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. विशाल भारव्दाजचा हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर इरफान खान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. विशाल भारव्दाज यांचा हा बिग बजेट चित्रपट असणार आहे. २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.