Selfish Teaser Out : ‘रेस-३’मधील पार्टी सॉन्गनंतर रोमॅण्टिक सॉन्गची धूम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 17:20 IST
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाच्या दुसºया गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात सलमान, बॉबी आणि जॅकलीनचा रोमॅण्टिक अंदाज बघावयास मिळत आहे.
Selfish Teaser Out : ‘रेस-३’मधील पार्टी सॉन्गनंतर रोमॅण्टिक सॉन्गची धूम!
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाच्या दुसºया गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘सेल्फिश या दुसºया गाण्याचे संपूर्ण व्हर्जन शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. टीजरमध्ये केवळ दोन लाइनचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि बॉबी देओलसोबत जॅकलीन फर्नांडिस रोमान्स करताना बघावयास मिळत आहे. वास्तविक हे संपूर्ण गाणे ‘गाना डॉट कॉम’वर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे लिरिक्स सलमान खानने लिहिले आहे, तर त्यास आतिफ असलम आणि सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरने आवाज दिला आहे. दरम्यान, ‘रेस-३’चे पहिले गाणे ‘हीरिए’ने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर आतापर्यंत दोन कोटी ६० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. दीप मनी आणि नेहा भिसनच्या या गाण्याला मीत ब्रदर्सनी संगीत दिले आहे. ‘हीरिए’मध्ये जॅकलीन फर्नांडिसच्या अदा बघण्यासारख्या आहेत. सलमानसोबत तिची चांगलीच केमिस्ट्री रंगल्याचे दिसून येत आहे. गाण्यात दोघांनीही तुफान डान्स केला आहे. जॅकलीन आणि सलमानची जोडी ‘किक’मध्ये प्रेक्षकांना प्रचंड पसंत आली होती. या चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. दरम्यान, या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म्स बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. ‘रेस-३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे. हा चित्रपट ईदनिमित्त १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.