आता तुम्ही म्हणाल की, या सेल्फीवर टीका करण्यासारखे काय आहे? तर या सेल्फीत ए. आर. रहमान सर्वांत पुढे दिसत असून, त्याच्या पाठीमागे विराट आणि अनुष्का ब्लर झाल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे रहमानची पत्नीही त्याच्या पाठीमागे उभी दिसत आहे. अशात सेल्फी रहमानने स्वत:वर फोकस केल्याची टीका यूजर्सकडून केली जात आहे. हा सेल्फी स्वत: रहमाननेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामुळे यूजर्सकडून त्याच्यावर चांगलीच टीका केली जात आहे.
दरम्यान, २६ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडसह क्रिकेटजगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या अगोदर विरूष्काने दिल्ली येथेही त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिले. या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले होते, तर मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात बी-टाउनमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवारासमवेत या सोहळ्यात हजेरी लावली होती. त्याचबरोबर ए. आर. रहमान यानेही आपल्या पत्नीसह सोहळ्यात उपस्थिती लावत या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.