Join us

​ सेलेना पुन्हा भडकली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:39 IST

अभिनेत्री सेलिना जेटली बॉलिवूडमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनी ती योगगुरु बाबा रामदेव ...

अभिनेत्री सेलिना जेटली बॉलिवूडमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनी ती योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर भडकलेली दिसली. काही वर्षांपूर्वीही रामदेव बाबांवर सेलेना अशीच भडकली होती. रामदेव बाबांनी अनेक वर्षांपूर्वी दिलेले एक बयान सेलेनाला जराही रूचले नव्हते. समलैंगिकता एक आजार आहे आणि योग या आजाराचा रामबाण उपाय आहे, असे रामदेव बाबा त्यावेळी म्हणाले होते. आज योगदिनी एका वेबसाईटने रामदेव बाबांच्या याच बयानाच्या आधारावर काही समलैंगिक कम्युनिटीतील लोकांचे मत जाणून घेतले. बाबा रामदेव तुमचा इलाज करू इच्छित असतील तर तुम्ही कराल का? असे तत्सम प्रश्न या लोकांना विचारण्यात आले. समलैंगिक कम्युनिटीतील या लोकांनी या निमित्ताने  रामदेव बाबांना चांगलेच आडव्या हाताने घेतले. मग काय, संपूर्ण समलैंगिक कम्युनिटी पुन्हा एकदा या मुद्यांवर एकजूट झाली आणि त्यांनी रामदेव बाबांचा विरोध केला. या विरोध नोंदवणाºयांमध्ये सेलिनाही होती.टिष्ट्वटरवर तीने याविरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.  The only way I will believe him (with all due respect) is, if he cures me of being "Straight" </div></div><div class=