पाहा शिबानी दांडेकरचा हॉट अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST
मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने नुकतेच केलेले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे. शिबानीने तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे.
पाहा शिबानी दांडेकरचा हॉट अंदाज!
मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने नुकतेच केलेले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे. शिबानीने तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. फोटोमध्ये शिबानी खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. आपल्या परफेक्ट फिगर आणि स्लटरी फोटोशूटमुळे शिबानीने सोशल मीडियावर आग लावली आहे. आयपीएलचे बरेचसे सीझन होस्ट करणाºया शिबानीने क्रिकेट जगतात ओळख निर्माण केली आहे. सध्या ती क्रिकेटपासून दूर असून, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपला जलवा दाखवित आहे. ‘नूर’ आणि ‘शानदार’ या चित्रपटांमध्ये झळकलेल्या शिबानीने ‘टाइमपास’मध्ये एक आयटम सॉँगही गायिले आहे. या आयटम सॉँगनेच तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. शिबानीने मॅक्सिम इंडियासाठी टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. शिबानीचे लहानपण आॅस्ट्रेलियात गेले आहे. ती एमटीव्हीची प्रसिद्ध वीजे अनुषा दांडेकर यांची मोठी बहीण आहे. अनुषा व्यतिरिक्त तिला आणखी एक अपेक्षा नावाची बहीण आहे. शिबानी अखेरीस कलर्स चॅनेलवरील ‘खतरों के खिलाडी-८’मध्ये बघावयास मिळाली होती. या शोमध्ये शिबानीने फारसा करिश्मा केला नव्हता. ती पहिल्या राउंडमधूनच शोच्या बाहेर पडली होती. दरम्यान, शिबानी तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते.