पाहा: शाहरूख-आलियाची ‘कबड्डी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 13:43 IST
स्पोर्टी लुक मधला किंगखान यात अतिशय हॅण्डसम दिसतोय. आलियाचा मित्र, तिचा मार्गदर्शक म्हणून तो या चित्रपटात दिसेल. आयुष्याबद्दल आलिया काहीशी गोंधळलेली आहे.
पाहा: शाहरूख-आलियाची ‘कबड्डी’
गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचं गोव्यात शूटिंग सुरू झाले, अगदी तेव्हापासून या चित्रपटाचा टीझर केव्हा रिलीज होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता आमच्याकडे शाहरूख-आलियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचा टीझर आऊट झालायं. या टिझरमध्ये शाहरूख खान आणि आलिया भट्ट एकदम कुल लुकमध्ये गोव्यातल्या अथांग समुद्रासोबत कबड्डी खेळतांना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय? पण होय, हे खरं आहे. कबड्डी या खेळातून शाहरूख आलियाला सकारात्मक दृष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. छोट्या छोट्या गोष्टींमधून आयुष्यात आनंद कसा मिळवायचा, हे तिला शिकवतोयं.स्पोर्टी लुक मधला किंगखान यात अतिशय हॅण्डसम दिसतोय. आलियाचा मित्र, तिचा मार्गदर्शक म्हणून तो या चित्रपटात दिसेल. आयुष्याबद्दल आलिया काहीशी गोंधळलेली आहे. अनेक प्रश्न तिच्या डोक्यात आहेत. हे सर्व प्रश्न ती शाहरूखच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करताना या चित्रपटात दिसणार. वेल, आलिया-शाहरूखची कुल केमिस्ट्री आणि काही हटके पाहायचे असेल तर मग पाहाच ‘डिअर जिंदगी’ हा टीझर :">http://