पाहा: रितेश-नर्गिसची ‘टायटॅनिक पोझ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 17:50 IST
सन १९९७ मध्ये आलेला हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘टायटॅनिक’ आठवतो ना! यातील केट विंसलेट आणि लिओनार्डो डी कॅप्रियो या दोघांनी ...
पाहा: रितेश-नर्गिसची ‘टायटॅनिक पोझ’
सन १९९७ मध्ये आलेला हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘टायटॅनिक’ आठवतो ना! यातील केट विंसलेट आणि लिओनार्डो डी कॅप्रियो या दोघांनी दिलेली एक पोझ चित्रपटाइतकीच अजरामर झाली आणि पुढे ‘टायटॅनिक पोझ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. हीच लोकप्रीय पोझ आता ‘बॅन्जो’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.‘बॅन्जो’मधील ‘उडन छु...’ या गाण्यात रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी यांनी ‘टायटॅनिक पोझ’ रिक्रिएट केली आहे. हे गाणे अनेक लोकेशन्सवर चित्रीत झाले आहे. एका सिक्वेन्समध्ये एका मोठ्या जंगलेल्या नावेवर रितेश व नर्गिसने ‘टायटॅनिक पोझ’ दिली आहे. नर्गिस उंचीपासून घाबरते. त्यामुळे खरे तर या गाण्याच्या शूटींगवेळी नर्गिस बरीच घाबरलेली होती. त्यामुळे रिटेकवर रिटेक झाले. पण रितेशने विश्वास दिला आणि त्यामुळे गाण्याचे शूटींग नर्गिस पूर्ण करू शकली. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.