पाहा: आर. माधवनच्या ‘विक्रम वेधा’चा फर्स्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 16:51 IST
‘साला खडूस’नंतर आर. माधवन कुठल्याच चित्रपटात दिसलेला नाही. पण लवकरच माधवन ‘विक्रम वेधा’ या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. आज ...
पाहा: आर. माधवनच्या ‘विक्रम वेधा’चा फर्स्ट लूक!
‘साला खडूस’नंतर आर. माधवन कुठल्याच चित्रपटात दिसलेला नाही. पण लवकरच माधवन ‘विक्रम वेधा’ या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला. या चित्रपटात आर. माधवन याच्यासोबत विजय सेतुपती हाही लीड रोलमध्ये आहे. दाट काळी-पांढरी दाढीसोबत या दोघांचा फर्स्ट लूक पाहता, येत्या काळात एक दमदार अॅक्शन फिल्म आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात माधवन एका एनकाऊंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत आहेत. तर विजय सेतुपती एका गँगस्टरच्या रोलमध्ये. गायत्री-पुष्कर दिग्दर्शित या क्राईम थ्रीलर सिनेमात आर माधवन व विजय सेतुपती यांच्याशिवाय वरलक्ष्मी सरथमकुमार, श्रद्धा श्रीनाथ आणि जॉन विजय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. }}}}‘विक्रम वेधा’नंतर माधवन मल्याळम सुपरहिट सिनेमा ‘चार्ली’च्या तामिळ रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘चार्ली’च्या मल्याळम व्हर्जनमध्ये दलकीर सलमान मुख्य भूमिकेत होता. आता माधवन यात लीड रोलमध्ये दिसणार आहे.ALSO READ : आर. माधवन बनणार एअरफोर्स पायलट!‘साला खडूस’ या चित्रपटात माधवन मार्शल आर्ट्स प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. माधवन लवकरच ह्यचंदा मामा दूर केह्ण या चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडची पहिली ह्यस्पेस मुव्हीह्ण असलेल्या या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सुशांत यात अंतराळवीराच्या भूमिकेत आहे. याच चित्रपटात आर. माधवन ही एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, यात माधवन एअर फोर्स पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. माधवन लवकरच ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडची पहिली ‘स्पेस मुव्ही’ असलेल्या या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत यात अंतराळवीराच्या भूमिकेत आहे. तर माधवन एअर फोर्स पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे.