अभिनय आणि मॉडलिंग क्षेत्रात झळकत असलेली प्रियमणी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. त्यातही वादग्रस्त कारणांमुळे ती आतापर्यंत बºयाचदा लाइमलाइटमध्ये आली आहे. परंतु यावेळेस ती वादग्रस्त नव्हे तर चांगल्या कारणांनी चर्चेत आहे. प्रियमणीला सध्या इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जात आहे. त्याचबरोबर इन्स्टावरील तिची फॅन्स फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रियमणी दररोज तिचे सुंदर फोटोज् सोशल अकाउंटवर पोस्ट करीत असल्याने तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. खरं तर साउथमध्ये प्रियमणीचे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते. कारण तिने जे काही यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्तपद आहे.
प्रियमणीने तिच्या करिअरची सुरुवात ‘कांचिपुरम सिल्क्स, इरोड सिल्क्स आणि लक्ष्मी सिल्क्स’ या बॅण्डच्या मॉडलिंगने केली होती. तेव्हा ती इयत्ता बारावीची परीक्षा देत होती. पुढे तामीळ दिग्दर्शक भारतीराजा याने तिला चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. सुरुवातीला तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. परंतु कार्थीसोबत आलेल्या ‘वासिगरन’ या चित्रपटातून तिला यश मिळत गेले. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. प्रियमणीने आज अभिनय क्षेत्रात बराचसा पल्ला गाठला असला तरी, तिने मॉडलिंग क्षेत्रापासून स्वत:ला दूर केले नाही. त्यामुळेच तिच्या यशात भर पडत असून, ती एक दमदार अभिनेत्री तथा मॉडेल म्हणून पुढे येत आहे.