Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : ​विद्या बालनची चुलत बहीण प्रियामणि अडकली लग्नबंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 13:47 IST

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणि अखेर लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड मुस्तफा राज याच्याशी ती विवाहबद्ध झाली. काल २३ आॅगस्टला बेंगळुरूमध्ये रजिस्ट्रारच्या ...

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणि अखेर लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड मुस्तफा राज याच्याशी ती विवाहबद्ध झाली. काल २३ आॅगस्टला बेंगळुरूमध्ये रजिस्ट्रारच्या आॅफिसमध्ये प्रियामणि व मुस्तफा यांनी लग्न केले. प्रियामणिची क्लोज मैत्रिण पारूल हिने प्रियामणिच्या संगीत सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रियामणिने यापूर्वी एका मुलाखतीत लग्नाबद्दलच्या तिच्या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. मी कायम साधेपणाने लग्न करू इच्छित होते आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली, असे ती म्हणाली. अर्थात  हे लग्न साधेपणाने झाले असले तरी या दोघांचे रिसेप्शन मात्र ग्रॅण्ड असणार आहे.बेंगळुरूमध्ये आज (२४ आॅगस्ट) या दोघांचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला सिने सृष्टीतील दिग्गज हजर राहतील. प्रियामणि व मुस्तफा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. मुस्तफा उद्योगपती आहे आणि मुंबईत राहणारा आहे. याशिवाय मुस्तफा सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा आयोजकही आहे.तुम्हाला कदाचित माहित नसेल पण प्रियामणि ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची कझिन आहे. शाहरूख खान स्टारर ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील ‘वन टू थ्री फोर’  या आयटम नंबरमध्ये प्रियामणि दिसली होती. याशिवाय मणिरत्नम दिग्दर्शित ‘रावण’मध्ये  अभिषेक बच्चनसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. गतवर्षी एका गँगरेपप्रकरणी कमेंट देऊन प्रियामणि वादात सापडली होती. भारत मुलींसाठी सुरक्षित नाही. मुलींनी देश सोडायला हवा, असे टिष्ट्वट तिने केले होते. तिच्या कमेंट्सनंतर सोशल मीडियावर ती बरीच ट्रोल झाली होती. अनेकांनी तिला देशद्रोही, आमिर खानची बहीण संबोधले होते.