Join us

SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 10:31 IST

आम्ही कालच तुम्हाला रणबीर कपूरच्या नव्या गर्लफ्रेन्डबद्दल ओझरती माहिती दिली होती. रणबीर आपल्या या नव्या गर्लफ्रेन्डला भेटायला विदेशात कुठल्याशा ...

आम्ही कालच तुम्हाला रणबीर कपूरच्या नव्या गर्लफ्रेन्डबद्दल ओझरती माहिती दिली होती. रणबीर आपल्या या नव्या गर्लफ्रेन्डला भेटायला विदेशात कुठल्याशा सीक्रेट ठिकाणी रवाना झाल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते.   खरे तर रणबीरला भारतातच भेटणे आवडले असते पण रणबीरची ही गर्लफ्रेन्ड भारतात येऊ शकत नसल्याने रणबीरने म्हणे सीक्रेट जागेची निवड केली. आता भारतात न येऊ शकणारी ही गर्लफ्रेन्ड कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आम्हालाही तो पडला होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळाले आहे. होय, कारण पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबतचे रणबीरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.होय, ही तीच माहिरा खान आहे, जी शाहरूख खानसोबत ‘रईस’मध्ये दिसली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान स्मोकिंग करताना दिसत आहेत. आता हे फोटो नेमके कुठले, हे कळायला मार्ग नाही. काहींच्या मते, हे फोटो न्यूयॉर्कच्या एका हॉटेलबाहेरचे आहेत. तर एका चर्चेनुसार, हे फोटो दुबईतील आहेत. याचवर्षी जुलैमध्ये संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी माहिरा दुबईत होती. यादरम्यान रबणीर माहिराला भेटायला दुबईला गेला होता. माहिरा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलबाहेरचे हे फोटो आहेत  विशेष म्हणजे, यातील माहिराचा फोटो झूम करून बघितल्यानंतर  तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही दिसत आहेत. या फोटोंवरून रणबीर व माहिरा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचाही दुबईतीलच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रणबीर कपूर आणि माहिरा खान दुबईत एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. या इव्हेंटमध्ये दोघांनीही अतिशय आनंदात कॅमे-यापुढे एकत्र पोझ वगैरे दिली होती. पण यानंतर अचानक  माहिरा खान रणबीरपुढे चक्क हात जोडताना दिसली होती.  होय, माहिरा रणबीरची हात जोडून विनवणी करतेय, असा एक बॅकस्टेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला  होता. या व्हिडिओत माहिरा अतिशय चिंतेत दिसली होती. याऊलट रणबीर मात्र एकदम कूल दिसत होता. अर्थात व्हिडिओला आवाज नसल्याने, रणबीर व माहिरामध्ये नेमके कशाबद्दल बोलताहेत आणि माहिरा इतकी चिंतेत का आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण कालांतराने माहिरानेच या व्हिडिओमागचे सत्य उघड केले होते.ALSO READ : काय? माहिरा खानला डेट करतोयं रणबीर कपूर? मी रणबीरला कुठलीही विनवणी वगैरे करत नव्हते. खरे तर आम्ही सिनेमावर चर्चा करत होता. राजकीय कारणामुळे मला भारतात 'रईस'चे प्रमोशन करता आले नाही, त्याचबद्दल मी व रणबीर बोलत होतो.मी शाहरुख खानसोबत प्रमोशन करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. पण माज्या इच्छांवर पाणी फेरले गेले. मनातल्या याच भावना हावभाव करुन मी  बोलून दाखवत होते. पण व्हिडिओमध्ये मात्र वेगळेच काही दिसून आले, असा भलामोठा खुलासा माहिराने केला आहे.