Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : ​राहुल देव झाला शर्टलेस तर मुग्धा गोडसे दिसली बिकनीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 15:23 IST

‘बिग बॉस10’मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात ...

‘बिग बॉस10’मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे कपल सध्या काय करतेय? तर श्रीलंकेत मज्जा करतेय. होय, मुग्धा व राहुल दोघेही सध्या श्रीलंकेत आहेत. आफताब शिवदासानी याच्या लग्नासाठी मुग्धा व राहुल दोघेही श्रीलंकेत पोहोचले. दोघांनी मित्राचे लग्न तर एन्जॉय केलेच, शिवाय रिजॉर्टमध्ये मस्तपैकी मस्तीही केली. या मज्जा-मस्तीचे काही फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात मुग्धा व राहुल दोघेही सनबाथ घेताना दिसताहेत. यात राहुल शर्टलेस आहे आणि मुग्धा ब्लॅक बिकनीत आहे.आफताबच्या लग्नाला हे जोडेपे ट्रॅडिशनल लूकमध्ये पोहोचले. मुग्धाने पिवळा शरारा परिधान केला होता तर राहुल सूटा-बुटात होता. ‘पॉवर कपल’ या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसलेले हे कपल गेल्या चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय.दोघांच्याही वयात १८ वर्षांचा फरक आहे. राहुल ४८ वर्षांचा आहे तर मुग्धा ३१ वर्षांची. १९९८ मध्ये राहुलने रीना देवशी लग्न केले होते. या दोघांचा २० वर्षांचा सिद्धांत नावाचा एक मुलगाही आहे. २००९ मध्ये कॅन्सरमुळे रीनाचा मृत्यू झाला. यानंतर राहुलने दुसरे लग्न केले नाही. पण तो मुग्धामध्ये गुंतला. मुग्धा गोडसे सध्या बॉलिवूडमध्ये फार सक्रिय दिसत नाही. तिच्याबद्दल सांगायचे तर ती मिस इंडिया 2004 ची सेमी फायनलिस्ट राहून चुकली आहे. मुग्धाने २००८ मध्ये मधुर भंडारकरच्या  ‘फॅशन’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने आॅल द बेस्ट. हेल्प, जेल, हिरोईन असे अनेक चित्रपट केलेत.