मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर या कपलची रोमॅन्टिक केमिस्ट्री कायम चर्चेचा विषय ठरते. नुकताच अंकिताचा वाढदिवस झाला. मिलिंदने आफ्रिकेतील किलीमांजारो या सर्वोच्च शिखरावर अंकिताचा वाढदिवस साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत. किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. मिलिंद व अंकिताने हे शिखर सर केले. केवळ इतकेच नाही तर या शिखरावर पाऊल ठेवल्यावर एकमेकांचे चुंबन घेत, आनंद साजरा केला. अंकिताचा वाढदिवस आणि एक सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद अशा या दुहेरी आनंदाचे क्षण कॅमे-यात कैद झालेत.
SEE PICS : आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर रंगला ‘या’ कपलचा रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:01 IST
किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. या शिखरावर कपलने एकमेकांना किस केले आणि...
SEE PICS : आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर रंगला ‘या’ कपलचा रोमान्स
ठळक मुद्दे प्रेमामध्ये वय कधीच आडवं येत नाही हे दाखवत मिलिंद आणि अंकिता गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधात अडकले होते.