SEE PICS : मुलगा आर्यन खानची स्टाइल कॉपी करताना दिसला किंग शाहरूख खान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 20:16 IST
काल रात्री बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. कदाचित आर्यन त्याच्या फॅमिलीला ...
SEE PICS : मुलगा आर्यन खानची स्टाइल कॉपी करताना दिसला किंग शाहरूख खान !
काल रात्री बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. कदाचित आर्यन त्याच्या फॅमिलीला खूपच मिस करीत असावा, म्हणून त्याने कॉलेजमध्ये सुट्या घेत थेट मुंबई गाठली. सध्या आर्यन विदेशात शिक्षण घेत आहे. आर्यन कॅलिफोर्नियातील ‘युनिर्व्हसिटी आॅफ सदर्न’ येथे त्याचे उच्च शिक्षण पूर्ण करीत आहे. दरम्यान, आर्यन सध्या मुंबईत परतला असून, विमानतळावरील त्याचा जलवा बघण्यासारखा होता. खरं तर आतापर्यंत आर्यन त्याच्या वडिलांची प्रत्येक स्टाइल कॉपी करताना बºयाचदा बघावयास मिळाला. मात्र यावेळेस उलट दिसत होते. होय, आर्यन नव्हे तर पप्पा शाहरूख खान आर्यनची स्टाइल फॉलो करताना दिसत होता. एकाच रंगाच्या लेदर जॅकेट्स आणि डार्क सनग्लासेजमध्ये हे दोघे बाप-बेटा नव्हे तर मित्रांसारखे दिसत होते. या दोघांची स्टाइल बघून विमानतळावरील बºयाचशा मुलींचा जीव त्यांच्यावर जडला असेल यात शंका नाही. नेहमीच मुलगी सुहानाबरोबर दिसणारा शाहरूख मुलगा आर्यनला सी आॅफ करण्यासाठी पोहोचला होता, तर सुहाना तिच्या मित्रांसोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळेच ती भाऊ आर्यनला सी आॅफ करण्यासाठी विमानतळावर येऊ शकली नसावी. शाहरूख त्याच्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूप गंभीर आहे. त्याची एकच इच्छा आहे, ती म्हणजे त्याच्या तिन्ही मुलांनी आर्यन, सुहाना आणि अबराम यांनी अगोदर त्यांचे शिक्षण पूर्ण करावे. आर्यन सध्या चित्रपटसृष्टीशी संबंधित विषयावर विदेशांत उच्च शिक्षण घेत आहे. शाहरूखच्या मते, आर्यनने इंडस्ट्रीत पदार्पण करण्याअगोदर शिक्षण पूर्ण करावे. त्यानंतरच त्याने इंडस्ट्रीत येण्याविषयीचा विचार करावा. काही दिवसांपूर्वीच निर्माता करण जोहरने म्हटले होते की, तो आर्यनला इंडस्ट्रीत लॉन्च करण्यास उत्सुक आहे. असो, ही चाहत्यांचीदेखील इच्छा असेल की, आर्यनने लवकरात लवकर त्याचे शिक्षण पूर्ण करून बॉलिवूडपणे पदार्पण करावे. असो, शाहरूखचा नुकताच ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. परंतु प्रेक्षकांनी त्यास सपशेल नाकारल्याने हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.